‘सर्जन’शील : वैद्यकीय पेशा आणि वैद्यकीय शिक्षण या विषयांचा 3६० अंशातून घेतलेला वेध हे या पुस्तकाचे एक बलस्थान आहे!
कुठलेही आत्मचरित्र ‘मी’भोवती घोटाळते. यातसुद्धा हा ‘मी’ आहे, असे सुरुवातीला वाटले, तरी पण पुढे जातो तसे तो एका त्रयस्थ भूमिकेतूनच शब्दांकित केला आहे, हे कळते. या ‘मी’ने जीवननिष्ठेची, व्यवसायनिष्ठेची, आनंद व्यवस्थापनाची, धाडस जोपासण्याची गुरुकिल्ली वाचकाला दिली आहे, असे वाटते. रुग्णाच्या भूमिकेतून वैद्यकीय पेशाकडे पाहायचा दृष्टीकोन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी शिक्षकाची धडपड, यात दिसते.......